All News

संवेदनशील माहिती चिनी हेराला दिल्यामुळे पत्रकाराला अटक

संवेदनशील माहिती चिनी हेराला दिल्यामुळे पत्रकाराला अटक

नवी दिल्ली, दि.  4 जुलै : भारताविषयी महत्त्वाची आणि संवेदनशील माहिती चिनी हेर विभागाच्या अधिकाऱ्यांना पुरवल्याच्या आरोपाखाली ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयाने दिल्लीतील एका फ्रीलान्सिंग पत्रकाराला अटक केली आहे. राजीव शर्मा असे या व्यक्तीचे नाव असून, त्याला एक जुलै रोजी अटक करण्यात आली.

राजीव शर्मा याला स्थानिक न्यायालयात दाखल केले असता सात दिवसांच्या ईडीच्या कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, प्रेस क्लब ऑफ इंडियाने या कारवाईचा निषेध केला आहे. ६२ वर्षीय राजीव शर्मा हे नावाजलेले फ्रीलान्सिंग पत्रकार असून प्रेस क्लब ऑफ इंडियाचे दीर्घकालीन सदस्य आहेत, असे पीसीआयकडून सांगण्यात आले आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार राजीव शर्मा याने चीनच्या हेर अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती पुरवली. त्यामुळे देशाची सुरक्षा आणि हिताला धक्का पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर राजीव शर्माला अटक करण्यात आली आहे. याबदल्यात राजीव शर्मा आणि इतर काही जणांना हवालामार्फत पैशांची देवाणघेवाण करण्यात आली होती. यासाठी दिल्लीच्या महिपालपूर परिसरात असलेल्या बनावट कंपन्यांचा वापर करण्यात आला. या कंपन्यादेखील चीनी नागरिकांच्या नावावर आहेत.

दरम्यान, ईडीने दिलेल्या माहितीनुसार, राजीव शर्मा चीनच्या गुप्तहेर अधिकाऱ्यांना भारताविषयीची गुप्त आणि संवेदनशील अशी माहिती पुरवत होता. त्याबदल्यात शर्मा आणि इतर काही अज्ञात व्यक्तींना पैसा दिला जात होता. हा पैसा हवालामार्फत पुरवला जात होता. यासाठी दिल्लीतील महिपालमध्ये असलेल्या बनावट कंपन्यांच्या नावांचा आधार घेण्यात आला. या कंपन्या चिनी नागरिकत्व असलेल्या कंपन्यांच्या नावावर होत्या. झँग चँग उर्फ सूरज, झँग लिक्सिया उर्फ उषा आणि किंग शी अशा तीन चिनी नागरिकत्व असणाऱ्या व्यक्तींसोबतच शेर सिंग उर्फ राज बोहरा या नेपाळी व्यक्तीच्या नावेदेखील या बनावट कंपन्यांची नोंद करण्यात आली होती. या चिनी कंपन्या पैसा हस्तांतरीत करण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करत होत्या. राजीव शर्माला बेनामी बँक खात्यांमधूनदेखील पैसे मिळाल्याचे ईडीने सांगितले.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात देखीलईडीकडून राजीव शर्माला अटक करण्यात आली होती. भारतीय लष्कराविषयी महत्त्वाची माहिती चिनी हेरांना दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती; मात्र अटकेनंतर ६० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने डिसेंबर २०२०मध्ये त्याला जामीन दिला होता.

Advertisement

IBPS Highclonoid Softec Pvt Ltd IBPS Highclonoid Softec Pvt Ltd