All News

CSK vs KKR : कोलकात्याने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजीचा निर्णय

CSK vs KKR :  कोलकात्याने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजीचा निर्णय

अबु धाबी, ०७ऑक्टोबर : आयपीएलच्या आजच्या मॅचमध्ये कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये कोलकात्याने त्यांच्या टीममध्ये एकही बदल केलेला नाही, तर चेन्नईने मात्र पियुष चावलाच्या ऐवजी कर्ण शर्माला संधी दिली आहे.

चेन्नई संघाने आतापर्यंत पाच पैकी तीन सामने जिंकले आहेत. तर कोलकाताने आतापर्यंत चार सामन्यांपैकी दोन सामन्यांवर विजयाची मोहर उठवली आहे. गुणतालिकेचा विचार करायचा झाल्यास चेन्नई संघ पाचव्या स्थानावर आहे. तर कोलकाता नाईटरायडर्स गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. 

Advertisement

IBPS IBPS MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd