नाशिक, ता. ९ जून : करडी पाथ एज्युकेशन कंपनी ह्या चेन्नईस्थित शैक्षणिक संस्थेला शैक्षणिक अध्ययन संसाधनांसाठीचा ह्यावर्षीचा लंडन बुक फेअर इंटरनॅशनल एक्सेलन्स अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. लंडन बुक फेअर आणि यु.के. प्रकाशक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे हे पारितोषक जिंकणारी करडी पाथ ही यावर्षीची एकमेव संस्था आहे. विविध श्रेणीतील पुरस्कारांसाठी ५ खंड व १५ देशांमधून नामांकने जाहीर झाली होती.
"पुरस्कारासाठी दाखल झालेले सर्व प्रस्ताव वाचताना परीक्षकांना खूपच आनंद झाला त्यापैकी शैक्षणिक अध्ययन संसाधन या प्रवर्गासाठी निवडलेली तिन्ही नामांकने उत्कृष्ट होती. ज्या वंचित समाजाला उच्च प्रतीचा शैक्षणिक संसाधनांचा उपभोग सहज शक्य होत नाही त्यांच्यापर्यंत करडी पाथ शैक्षणिक उपक्रम त्यांच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोन, अष्टपैलू व सर्जनशील अशी साधने व समाजातील अस्तित्व यामुळे सहज पोहोचते म्हणूनच करडी पाथ शैक्षणिक प्रकल्पाची विजेता म्हणून निवड करण्यात आली" असे लंडन बुक फेअर कडून देण्यात आलेल्या प्रशस्तिपत्रात नमुद करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या परवडणारी व तंत्रज्ञानाचा वापर करून वंचित भागात आदिवासी व ग्रामीण शाळांमध्ये आपली संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.
जगातील नामांकित संस्थांपैकी एक असलेल्या लंडन बुक फेअर संस्थेकडून करडी पाथच्या नविण्यापूर्न उपक्रम व भाषा प्रशिक्षणातील कामाला पुरस्कार मिळणे ही केवळ आमच्या कामाची पावती नसून भारत व भारताबाहेरील पुढील वाटचालीसाठी आमची प्रेरणा देखील आहे. भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याला आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी करडी पाथ मधील कार्यरत प्रत्येक व्यक्ती कठोर प्रयत्न करीत आहे. करडी उपक्रमाच्या २५ व्या वर्षी हा पुरस्कार मिळणे हे आम्ही भाग्याचे समजतो अशी भावना करडी पाथ चे सहसंस्थापक सी. पी. विश्वनाथ यांनी व्यक्त केली.
कोरोना काळात करडी पाथ मार्फत गाव पातळीवर विद्यार्थ्यांपर्यंत पोचताना उपयुक्त ठरणारी संसाधने अँड्रॉइड मोबाईल ॲप व लघु चित्रफितीच्या माध्यमातून शिक्षकांना देण्यात आले. ह्या संसाधनांमुळे आदिवासी भागातील प्रकल्पामध्ये कोरोनामुळे बंद असलेली शिक्षणाची दारं खुली झाली. खुली मैदाने, घरासमोरील पडती, गावातील मंदिरं तसेच गल्लीत देखील या संसाधनांचा वापर करून शिक्षकांनी शाळा सुरू ठेवली, काही ठिकाणी तर खाजगी वाहनांचा वापर करून शिक्षकांनी चालती फिरती शाळाच सुरू केली (शाळेला जणू पंखच लावले). अध्ययन-अध्यापनाच्या पद्धतीला कलाटणी देणाऱ्या व नावीन्यपूर्ण साधनांचा वापर करणाऱ्या अशा सर्व यशोगाथांची दखल लंडन बुक फेयरने घेतली.
इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड २९ जुन रोजी "त्यांच्या संभाषणात..." या ऑनलाइन बुक फेअर मालिकेदरम्यान साजरा करण्यात येणार आहे. सर्व विजेते त्यांचे कार्य व मुख्य अडथळे यांच्याबद्दल संभाषण करणार आहेत. निर्मित्यांचे संभाषण, प्रकाशकांचे पॅनल, चर्चासत्र इत्यादी ह्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असणार आहे.
एन.एस.इ फाउंडेशनच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील ४२४ जिल्हा परिषद शाळांमध्ये करडी पाथचा मॅजिक इंग्लिश वाचन उपक्रम राबविला जात असून महाराष्ट्र आदिवासी विकास विभागामार्फत अजून एका उपक्रमातून राज्यातील १४ प्रकल्प कार्यालयांच्या ३९३ एकलव्य आश्रम शाळा तसेच शासकीय आश्रमशाळांमध्ये देखील करडी पाथ कार्यरत आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात खालपुर तालुक्यातील १७ जिल्हा परिषद शाळांमध्ये देखील गोदरेज अँड बॉइस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड मार्फत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत करडी पाथचा उपक्रम राबविला जात आहे.
करडी पाथ एज्युकेशन कंपनी:
चेन्नईस्थित करडी पाथ एज्युकेशन कंपनी इंग्रजी भाषा प्रभावीपणे आत्मसाद करता यावी या उद्देशाने कार्य करते. श्रवण, अनुकरण, संगीत, कथाकथन तसेच अभिनय यांच्या माध्यमातून भाषा शिकण्याच्या कार्यपद्धतीने करडी पाथ आत्तापर्यंत ३५०० शासकीय शाळा व १००० खाजगी शाळांच्या निमित्ताने १८ राज्यांमधील ७५००० शिक्षक व एक दशलक्ष विद्यार्थ्यांपर्यंत आपली छाप पाडण्यात यशस्वी झाली आहे. करडी पाथशी संलग्न असणारी करडी टेल्स ही बोलती पुस्तके तयार करणारी भारतातील अग्रगण्य संस्था असून लहान मुलांसाठीची एक पुरस्कार विजेती पुस्तक प्रकाशक देखील आहे.
लंडन बुक फेअर:
वार्षिक सभा भरवणारी लंडन बुक फेअर हे पुस्तक जगतासाठी केंद्रस्थान असून २५००० पेक्षा अधिक प्रकाशक ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम जाणून घेतात. आपल्या ५० व्या वर्षी कार्यरत असणारे लंडन बुक फेअर हे पुस्तक जगतील विशेष प्रतिभांना चालना देते. लंडन बुक फेअर पारितोषिक हे प्रकाशन जगात उत्कृष्ट असणाऱ्यांपासून तर नाविन्यपूर्ण उपक्रमांनी प्रकाशन जगात प्रवेश करणाऱ्या सर्वांना खुले असते.
Copyright © 2023 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.