लंडन, दि. १३ ऑगस्ट : इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुल या सलामी जोडीने भारतीय संघाला धमाकेदार सुरुवात करुन दिली. पन्नाशीनंतर त्यांनी धावांची शंभरी पार करत मजबूत आघाडीच्या दिशेने वाटचाल केली. मात्र अनुभवी गोलंदाज जेम्स अंडरसनने रोहितची विकेट घेत त्यांच्या विक्रमी भागिदारीवर अंकुश लावला.
इंग्लंड आणि भारत यांच्यात ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या दिवशी भारताने अतिशय दमदार सुरुवात केली. यात भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी दमदार फलंदाजी करत भारताला शतकाच्या पार नेत भक्कम सलामी दिली. मात्र, त्यानंतर रोहित शर्मा (83) अँडरसनचा शिकार झाला आणि चेतेश्वर पुजारा (9) देखील अँडरसनकरवे स्वस्तात बाद झाला.
Copyright © 2023 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.