All News

लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला २ कोटींचा टप्पा

लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला २ कोटींचा टप्पा

मुंबई, दि. १८ मे :  कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात आज महाराष्ट्राने २ कोटीचा टप्पा ओलांडला. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.

काल राज्यात १२३९ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ९९,६९९ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. महाराष्ट्राने आतापर्यंत २ कोटी ९० हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली आहे. राज्यात आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील ६ लाख ५५ हजार नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. महाराष्ट्र सुरुवातीपासूनच कोरोना प्रतिबंध लसीकरणात देशात अग्रेसर असून पाठोपाठ राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश राज्यांचा क्रमांक लागतो.

Advertisement

IBPS Highclonoid Softec Pvt Ltd MahaExam IBPS