All News

मंत्री वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त

मंत्री वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त

नागपूर, दि. ७ जानेवारी  : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. वडेट्टीवार यांच्यावर गुन्हे लपवल्याचा आरोप आहे. भाजपचे माजी आमदार मितेश भांगडिया यांनी तक्रार केली होती. त्यात त्यांनी वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर असणार्‍या क्रिमिनल केसेस लपवल्या असल्याचा आरोप केला होता. भांगडिया यांनी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांपासून ते पासपोर्ट ऑफिसपर्यंत तक्रार केली होती. तरीही कारवाई झाली नाही, तेव्हा ते उच्च न्यायालयात गेले. 


माहितीनुसार वडेट्टीवार यांनी पासपोर्टसाठी मनोरा हा कायमचा पत्ता दिला होता. तिथल्या पोलिस ठाण्यातून ना हरकत दाखला घेतला होता. त्यात त्यांच्यावर कुठेही केसेस सुरू नाहीत, असे म्हटले होते.  त्यामुळे भांगडिया यांनी न्यायालयात धाव घेतली. त्या वेळी न्यायालयाने पासपोर्ट कार्यालयाला नोटीस काढली. त्यानंतर पासपोर्ट कार्यालयाने वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त केला असल्याची माहिती आहे. 


याबाबत वडेट्टीवार म्हणाले, की माझ्यावर कुठल्याही केसेस नाहीत. त्या वेळी माझ्यावर चार किरकोळ राजकीय केसेस होत्या. स्पेशल ब्राँचकडून माझ्यावर कुठल्याही केसस नाही, असे हे पत्र आहे. तेव्हा केसेस होत्या, पोलिसांनी तपासायला हवे होते. मी आता ओबीसींसाठी इतके करतो आहे. हे माझ्या विरोधातील राजकीय षडयंत्र आहे.

Advertisement

IBPS MahaExam IBPS Highclonoid Softec Pvt Ltd