मुंबई, दि. २३ जून : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने आज सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी उच्चांकाची नोंद करीत ६ लाख २ हजार १६३ नागरिकांना लस दिली. एकाच दिवशी एवढ्या संख्येने लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. लसीकरणाची विक्रमी कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
काल एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार ९०९ जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविला होता. लसीकरणात सातत्य टिकवत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. आतापर्यंत सुमारे २ कोटी ९१ लाखांहून अधिक लस मात्र राज्यात देण्यात आल्या आहेत. आज दिवसभरात ६ लाख २ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. सायंकाळी सात वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात अजून वाढ होऊ शकते, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
Copyright © 2023 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.