All News

दिवसभरात ३ हजार ११९ रुग्णांची कोरोनावर मात

दिवसभरात ३ हजार ११९ रुग्णांची कोरोनावर मात

मुंबई, दि. १९ डिसेंबर :  राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या ही आता 19 लाखांच्या जवळ गेली आहे. शनिवारी राज्यात 3 हजार 940 रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण संख्या ही 18 लाख 92 हजार 707वर गेली आहे. दिवसभरात 3 हजार 119 रुग्णांनी  कोरोनावर मात केली. कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या ही 17 लाख 81 हजार 841 एवढी झालीय. कोरोना रुग्णांची संख्या सध्या आटोक्यात आहे त्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 94.14वर गेलं आहे. शनिवारी 75 रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू दर हा 2.57वर पोहोचला आहे.


आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 12059235 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 18,92, 707 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5, 00,360 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4020 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


Advertisement

IBPS Highclonoid Softec Pvt Ltd MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd