All News

महाराष्ट्र अपघातमुक्त करणार : ठाकरे

महाराष्ट्र अपघातमुक्त करणार : ठाकरे

मुंबई, दि. १८ जानेवारी : सध्या महाराष्ट्र रस्ते अपघातात दुसर्‍या क्रमांकावर आहे. मला अपघाताची आकडेवारी कमी नाही करायची, तर मला या यादीत महाराष्ट्राचे नाव नकोच आहे. मला अपघातमुक्त महाराष्ट्र हवा आहे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.


ठाकरे यांनी आज रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्‌घाटन केले. रस्ते सुरक्षा हा सप्ताह, महिना यापुरता मर्यादित न राहता ही जीवनशैली व्हावी. नियम आणि संयम या दोन्ही शब्दांत यम आहे. जर तुम्ही वाहन चालवताना नियम आणि संयम नाही पाळला, तर यम भेटीला येतो जो आपला जीव घेऊन जातो. त्यामुळे यमाला टाळायचे असेल तर नियम आणि संयम या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, असे ते म्हणाले. रस्ते फक्त माणसेच क्रॉस करत नाहीत, तर प्राणी ही करतात. त्यांची ही काळजी घ्यायला हवी. नवीन तंत्रज्ञान, नवीन वेगाच्या गाड्या येत आहेत. त्या दृष्टीने माहिती देणे आणि जनजागृती करणे महत्वाचे आहे. या क्षेत्रात काम करणा-या स्वयंसेवी संस्था, व्यक्तींना धन्यवाद! ते अपघात होऊ नयेत, म्हणून जनजागृतीचे महत्वाचे काम करत आहेत. रस्ते नियम पळताना ज्या सोयी सुविधा असतात, त्यात सहजता हवी. त्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.


ठाकरे म्हणाले, की अघात होऊच नयेत, म्हणून प्रयत्न व्हावेत. धोक्याचे वळण, अपघाताच्या जागा लक्षात घेऊन ट्रॉमा केअर उभारण्यात यावेत. दुर्दैवाने अपघात झाला, तर जीव वाचवण्यासाठी प्रयत्न आणि सुविधा हवी. वाहन चालवण्याच्या प्रशिक्षण संस्थांमधील कर्मचा-यांना सगळे नियम आणि शिस्त याची माहिती हवी, तरच ते प्रशिक्षण देऊ शकतील. वाहतूक नियम, शिस्त यांचे पालन करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे शिक्षण द्यावे. मुले सज्ञान झाली, तर पालक ही सज्ञान होतील. 


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अपघात कमी करणार्‍या जिल्हाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. यात मुंबई, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग आणि औरंगाबाद जिल्ह्यांचा समावेश होता. टाटा इनिशिटीव्ही आणि परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या वेब सिरीजचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांनी केले. या वेळी मुख्यमंत्र्यांसह इतरांनी रस्ता सुरक्षासंदर्भातील शपथ घेतली. परिवहन विभाग आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पिकसलसेन्ट यांच्यातर्फे आयोजित रस्ता सुरक्षा लघुपट स्पर्धेची घोषणा करण्यात आली.

Advertisement

test 4 MahaExam IBPS Highclonoid Softec Pvt Ltd