All News

मुंबईने पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान गाठलं

मुंबईने पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान गाठलं

शारजाह, दि. ०४ ऑक्टोबर  : आयपीएल च्या यंदाच्या मोसमात मुंबईचा सलग दुसरा विजय झाला आहे. सनरायजर्स हैदराबादचा ३४ रनने पराभव करत मुंबईने पॉईंट्स टेबलमध्येही अव्वल स्थान गाठलं आहे. 


मुंबईने २० ओव्हरमध्ये ५ विकेट गमावून २०८ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माचा अपवाद वगळता मुंबईच्या सर्व फलंदाजांनी चांगली खेळी केली. मुंबईकडून क्विंटन डी कॉकने सर्वाधिक ६७ धावा केल्या. तर अखेरच्या काही षटकात हार्दिक पांड्या, किरन पोलार्ड आणि कृणाल पांड्या या तिकडीने फटकेबाजी केली. हार्दिकने २८, पोलार्डने २५ तर कृणाल पांड्याने नाबाद २० धावा केल्या.


हैदराबादकडून संदीप शर्मा आणि सिद्धार्थ कौलने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. इशान किशननं शॉर्ट थर्डमॅनवर वॉर्नरचा झेल टिपला. वॉर्नर ४४ चेडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ६० धावा करून माघारी परतला. वॉर्नर बाद झाल्यानं  सनरायजर्स हैदराबादच्या हातून सामना गेला अन्  मुंबईनं सहज विजय मिळवला. हैदराबादला ७ बाद १७४  धावा करता आल्या. 

Advertisement

test 4 MahaExam test2 IBPS