All News

बीएचआर बँक घोटाळा ११०० कोटींचा ; यातील सर्व सत्‍य बाहेर येणार : एकनाथ खडसे

बीएचआर बँक घोटाळा ११०० कोटींचा ; यातील सर्व सत्‍य बाहेर येणार : एकनाथ खडसे

जळगाव, दि. ३० नोव्हेंबर : बीएचआर सहकारी बँकेतील घोळ उघडकीस आल्यानंतर २०१७ साली आपण तक्रार केली होती. याप्रसंगी तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे तक्रार केली. मात्र, त्यांनी या प्रकरणी केंद्राकडे तक्रार करण्याचे सुचविले. यानुसार रक्षाताई खडसे यांच्यासह राधामोहन सिंग यांच्याकडे तक्रार केली. यानुसार राधामोहन सिंग यांनी सांगितल्यानंतर संबंधित खात्याकडे तक्रार केली. मात्र, यापुढे चौकशी झाली नाही. यामुळे हे प्रकरण दडपण्यात आल्याचा आरोप, एकनाथ खडसेंनी केला. यातील सर्व सत्‍य बाहेर येणार असून, या प्रकरणात बड्या नेत्‍याचे नाव असून ज्‍याचा संबंध मंत्र्यांशी राहिला असल्‍याचा गौप्यस्‍फोट एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. अ‍ॅड. किर्ती पाटील यांच्या माध्यमातून याप्रकरणी पाठपुरावा करत असल्याची माहिती खडसे यांनी दिली.


खडसे यांनी सांगितले की, बीएचआरचा साधारण 1100 कोटी रूपयांचा घोटाळा आहे. याबाबत 2018 मध्ये ॲड. किर्ती पाटील यांनी राधा मोहन यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्‍यावेळी त्‍यांनी राज्‍य शासनाला सदर प्रकरणाची चौकशी इओडब्‍ल्‍यू यांच्या मार्फत करण्याचे आदेश काढले होते. मात्र या प्रकरणाची चौकशीत पुण्यात राजकीय व्यक्‍तीकडून दबाव आणण्यात आल्‍याने तात्‍पुरती स्‍वरूपाची चौकशी झाल्‍याचे दाखवून प्रकरण दडपण्यात आले. इतकेच नाही, तर त्‍यावेळी विरोधी पक्षनेते असलेले धनंजय मुंडे यांनी देखील बीएचआरचे अवसायक असलेले कंडारे यांच्याकडे माहिती मागितली होती. मात्र त्‍यांनी दिली नाही. पण बीएचआरची प्रॉपर्टी कमी किंमतीत घेतल्‍याचे खडसे यांनी सांगितले

Advertisement

MahaExam IBPS test 4 IBPS