All News

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांना कोरोना पॉझिटिव्ह

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांना कोरोना पॉझिटिव्ह

नागपूर, दि. १० डिसेंबर  : विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात पराभवाचा झटका बसलेल्या महापौर संदीप जोशी यांना आणखी एक धक्का बसला आहे. जोशी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनीच ट्वीटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.


मागील आठ महिन्यांपासून कोरोनाशी लढा सुरू असताना माझा आता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करावी, असे आवाहन जोशी यांनी केले आहे. यापूर्वी संदीप जोशी यांचा वाहनचालक आणि काही स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने ते स्वतःहून क्वारंटाईन झाले होते. तेव्हा त्यांना कोरोना झाला नव्हता. त्यानंतरही कोरोनाच्या लढ्यात ते सक्रिय होते.

Advertisement

test2 MahaExam IBPS Highclonoid Softec Pvt Ltd