नाशिक, दि. ९ एप्रिल : कोरोना काळात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी देवासारखे धावून येत आहेत. त्यातच लोकांच्या अडचणीचा गैरफायदा घेणारेही काही डॉक्टर आणि रुग्णालये आहेत. नाशिकच्या एका खासगी रुग्णालयाने पैसे भरले नाही, म्हणून वृद्धाला तीन दिवस डांबून ठेवले. हा धक्कादायक प्रकार पालिका प्रशासनाच्या लक्षात आल्यावर वृद्धाची सुटका केली.
नाशिकच्या वोकहार्ड रुग्णालयात एका वृद्धाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाने पाच लाख रुपयांचा मेडिकल इन्शुरन्स संपवला त्यानंतर 50 हजार आगाऊ भरूनदेखील दीड लाख रुपये भरण्यास सांगितले. शेवटी 12 लाख रुपयांचे बील न दिल्याने वृद्धाला तीन दिवस डांबून ठेवण्यात आले. पैसे भरण्यासाठी रुग्णाच्या नातेवाइकांकडे रुग्णालयाने तगादा लावला. पैसे भरले नाही तर सुटका नाही, असा दम रुग्णालयाने दिला. रुग्णाने जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांकडे संबधित रुग्णालयाची तक्रार केली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अखेर पालिका प्रशासनाने कारवाई करत वृद्धाची सुटका केली आहे. उल्हास केशव कोल्हे (रा, जळगाव) यांच्याबाबतीत हा प्रकार घडला आहे.
Copyright © 2023 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.