All News

देशातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये नाशिकचा कितवा नंबर? जाणून घ्या सविस्तर

देशातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये नाशिकचा कितवा नंबर? जाणून घ्या सविस्तर

नाशिक, दि. २० ऑगस्ट : मध्य प्रदेशातील इंदूर शहराने पुन्हा एकदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून पहिलं स्थान कायम राखलंय. दुसर्‍या क्रमांकावर गुजरातमधील सुरत, तर तिसर्‍या क्रमांकावर महाराष्ट्रातील नवी मुंबई शहर आहे. मात्र देशात नाशिक ११ व्या क्रमांकावर आहे. याआधी नाशिकला पाच मानांकन तर धुळ्याला तीन मानांकन मिळाले होते. आता नाशिकने यात सुधारणा केली असून राज्यात नवी मुंबई नंतर दुसऱ्या क्रमांकाचे  स्वच्छ शहर म्हणून नाशिकला मान मिळाला आहे.


स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईसह इतर शहरांचाही समावेश आहे. यामध्ये नाशिक ११, ठाणे १४, पुणे १५, नागूपर १८, कल्याण डोंबिवली २२, पिंपरी चिंचवड २४, औरंगाबाद२४, वसई-विरार ३२ आणि मुंबई ३५ व्या क्रमांकावर आहे.

Advertisement

test 4 IBPS Highclonoid Softec Pvt Ltd MahaExam