All News

Tokyo Olympic 2020 : भालाफेकपटू नीरज चोप्राला 'सुवर्ण'

Tokyo Olympic 2020 : भालाफेकपटू नीरज चोप्राला 'सुवर्ण'

टोकियो, दि. ७ ऑगस्ट : नीरज चोप्राने टोकीयो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी करत भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमधलं हे एकमेव सुवर्ण पदक आहे. भारताने आज ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंतची सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रमही मोडला आहे. भारताने आतापर्यंत सात पदके जिंकली आहेत.

नीरजसह 12 स्पर्धेक अंतिम फेरीत होते. नीरज चोप्रा (भारत), वेबर (जर्मनी), वडलेज (चेक रिपब्लिक), वेटर (जर्मनी), कॅटकवेट्स (बेलारूस), नदीम (पाकिस्तान), मियालेस्का (बेलारूस), मारडारे (मोल्डोवा), वेसली (चेक रिपब्लिक), नोवाक (रोमानिया), इटेलाटालो (फिनलँड), ॲम्ब (स्वीडन) हे स्पर्धक होते. नीरजने पहिल्या प्रयत्नात 87.03, दुसऱ्या प्रयत्नात 87.57, तिसऱ्या प्रयत्नात 76.97 मिटर लांब भाला फेकला. नीरजचा चौथा आणि पाचवा प्रयत्न फाऊल झाला. भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याच्या खेळाकडं भारताच्या नजरा लागल्या होत्या. करोडो भारतीयांचं स्वप्न नीरजनं पूर्ण करत टोकियो ऑलम्पिकमधील पहिलं सुवर्ण पदक भारताला मिळवून दिलं आहे. पहिल्या फेरीत त्याने 87.03 मीटर लांब भाला फेक करत आघाडी मिळवली. नीरज चोप्रा भारताला यंदाच्या ऑलंम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून देतो का याकडं सर्वांच लक्ष लागलं होतं, अखेर कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न नीरज चोप्राने पूर्ण केलं आहे. दुसऱ्या फेरीत नीरज चोप्रानं 87.58 मीटर एवढ्या अंतरावर थ्रो फेकला आहे. पहिल्या दोन फेऱ्यांपासून नीरज चोप्रा आघाडीवर होता. दुसऱ्या फेरीत नीरज चोप्रानं फेकलेल्या थ्रोची आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. टोकिओ ऑलिम्पिकमधील आणि भालाफेकीत मिळणारं हे भारताचं पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे. नीरज चोप्रा हा हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावातील आहे. 

Advertisement

test2 IBPS test 4 Highclonoid Softec Pvt Ltd