All News

मृत गाईची कातडी बाळगणे गुन्हा नाही

मृत गाईची कातडी बाळगणे गुन्हा नाही

  • उच्च न्यायालयाचा निकाल; कत्तलीस मनाई, मांस बाळगण्यास नव्हे

नागपूर, दि. २२ डिसेंबर : मृत गायींची किंवा बैलांची कातडी बाळगणे हा गुन्हा नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 अन्वये गाय-बैलांची कत्तल, आयात निर्यात व मालकी करण्यास मनाई आहे; मात्र मृत गायी किंवा बैलांचे मांस बाळगणे गुन्हा नाही, असा निकाल न्या. व्ही. एम. देशपांडे आणि अनिल किशोर यांच्या खंडपीठाने दिला आहे. 


14 डिसेंबर रोजी शफिकउल्लाह खान या गाडी चालकाने यासंदर्भातली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना मृत गायींचे आणि बैलांचे मांस बाळगणे गुन्हा नाही असे नागपूर खंडपीठाने म्हटलं आहे. शफिकउल्ला खान या चालकावर मृत गायी बैलांची कातडी बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मृत प्राण्यांचे कातडे बाळगण्यात गैर काय असा प्रश्न विचारत या चालकातर्फे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आता नागपूर खंडपीठाने निर्णय दिला आहे.


गोवंश हत्या, विक्री, वाहतूक आणि खरेदीवर सरकारने घातलेल्या बंदीचा निर्णय न्यायालयाने योग्य ठरवला. गोवंशाचे संवर्धन करणे आणि त्यासाठी त्यांच्या हत्येला प्रतिबंध करणे किती महत्त्वाचे आहे, याबाबत सरकारने मांडलेली भूमिका न्यायालयाने बंदीचा निर्णय योग्य ठरवताना मान्य केली. त्याच वेळेस गोवंश हत्या ही मुस्लिम धर्मीयांच्या प्रथेचा भाग आहे; परंतु काही गरीब मुस्लिम बक-याचा बळी देऊ शकत नसल्याने ते गोवंशाचा बळी देतात, असा दावा कायद्याच्या वैधतेला आव्हान देणा-या  काही याचिकाकर्त्यांनी केला होता.

Advertisement

test2 Highclonoid Softec Pvt Ltd IBPS MahaExam