All News

एक देश एक निवडणूक ही देशाची गरज : पंतप्रधान

एक देश एक निवडणूक ही देशाची गरज : पंतप्रधान

नवी दिल्ली, दि. २६ नोव्हेंबर : एका राष्ट्र एक निवडणुक या मुद्यावर चर्चा करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. लोकसभा, विधानसभा किंवा स्थानिक पंचायत पातळीवर निवडणूक एकाचवेळी यावर देशपातळीवर चर्चा होणे आवश्‍यक आहे.


या सर्व निवडणुकांसाठी एकच मतदार यादी वापरली जाऊ शकते. विधिमंडळ कार्यात वापरल्या जाणाऱ्या डिजिटल नवकल्पना या कामी प्रत्यक्षात आणल्या पाहिजेत असे ते म्हणाले. मोदी आज गुजरातमधील केवडिया येथे आयोजित केलेल्या 80 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या समारोप सत्राला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते.  मोदी म्हणाले, की 'वन नेशन वन इलेक्शन' बद्दल गांभीर्याने विचारमंथन आवश्यक आहे. 'वन नेशन वन इलेक्शन' केवळ विचार मंथनाचा विषय नाही ही देशाची गरज आहे आता आपल्याकडे काही महिन्यांनी देशात कुठे ना कुठे निवडणूक होत असतात. त्यामुळे विकासकामांमध्ये अडथळा येतो. देशाच्या प्रगतीचा वेग मंदावतो. याबद्दल आपण गांभीर्याने विचार करायला हवा, असे मत मोदींनी यावेळी मांडलं. आपल्या मतदारयाद्यावर आपण पैसा वेळ खर्च करतोय असा सवाल उपस्थित करत लोकसभा-विधानसभा आणि अन्य निवडणुकांसाठी केवळ एका मतदार यादीचा वापर व्हायला हवा असं ही ते यावेळी म्हटलं.

Advertisement

test 4 IBPS Highclonoid Softec Pvt Ltd IBPS