All News

पीएम - किसान योजनेअंतर्गत आर्थिक लाभाचा 8 वा हप्ता पंतप्रधान शुक्रवारी जारी करणार

पीएम - किसान योजनेअंतर्गत आर्थिक लाभाचा 8 वा हप्ता पंतप्रधान शुक्रवारी जारी करणार

नवी दिल्ली, दि. १३  मे :  पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मे रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम - किसान ) योजनेअंतर्गत आर्थिक लाभाचा 8 वा हप्ता जारी करणार आहेत. यामुळे 19,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी 9.5 कोटीहून अधिक लाभार्थी शेतकरी कुटुंबांना हस्तातंरित केला  जाईल. पंतप्रधान या कार्यक्रमादरम्यान शेतकरी लाभार्थ्यांशी संवाद साधतील. यावेळी केंद्रीय कृषिमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.


पीएम - किसान संदर्भात  : पीएम-किसन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना दरवर्षी  6000 रुपये याप्रमाणे  प्रत्येकी 2000 रुपयांचे  तीन समान हप्ते चार महिन्यांच्या कालावधीनंतर  प्रदान केले जातात . हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जातो. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 1.15 लाख कोटी रुपयांचा  सन्मान निधी शेतकरी कुटुंबांना हस्तांतरित करण्यात आला आहे.

Advertisement

MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd test2 test 4