All News

विषारी दारूचे अलिगडमध्ये 85 बळी

विषारी दारूचे अलिगडमध्ये 85 बळी

लखनऊ, दि. ३  जून : अलिगडमधील करसुआ गाावात विषारी दारू पिल्याने 85 लोकांचे मृत्यू झाले. या गावच्या सरपंचांनी ऑक्टोबर 2020 मध्येच तक्रार देऊन हा दारू ठेका बंद करण्याची मागणी केली होती; मात्र उत्पादन शुल्क विभागाने दोनवेळा या ठेक्याला ’क्लिन चिट’ देत पाठिशी घातले. अखेर याच ठेक्यावर दारू पिल्याने 85 लोकांना आपला जीव गमवावा लागला.

85 जणांचा बळी घेणारा हा दारूठेका अलिगडमधील करसुआ गावात आहे. गावकर्‍यांनी लेखी तक्रार देऊनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. करसुआ गावचे सरपंच रितेश उपाध्याय यांनी स्वतः याबाब उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार केली होती. यानंतर उत्पादन शुल्क विभागाने या ठेक्याला ’क्लिन चिट’ दिली. आता या ठेक्यातील दारूने अनेक लोकांचे जीव घेतले. आधी तक्रार देऊनही कारवाई न करणारे प्रशासन इतक्या लोकांच्या मृत्यूनंतर आता खडबडून जागे झाले. विषारी दारू मृत्यूप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह एकूण 33 जणांना अटक केली. यात 50-50 हजार रुपयांचे बक्षीस डोक्यावर असलेल्या गुन्हेगारांचाही समावेश आहे.

एसएसपी कलानिधी म्हणाले, की या प्रकरणाच्या तपासासाठी सहा सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. ही समिती पुराव्यांच्या आधारे छापेमारी करत आहे. यात अवैध दारू निर्मितीत वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिस सातत्याने छापेमारी करत आहे. विषारी दारू पिल्याने आतापर्यंत 85 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही घटना होऊन चार दिवस झाले, तेव्हापासून दररोज मृतांचा आकडा वाढत आहे. हा आकडाही वाढण्याची शक्यता आहे. विषारी दारूमुळे अनेकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण अद्याप रुग्णालयात गंभीर स्थितीत आहेत; मात्र सरकारवर आता मृत्यूची आकडेवारी लपवली जात असल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाने आतापर्यंत केवळ 25 मृत्यूची माहिती दिली. याशिवाय झालेले मृत्यू संशयास्पद आहेत असून या मृतदेहांच्या शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येईल, असा दावा केला.


उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांवर कारवाई

तक्रारीनंतरही संबंधित अवैध दारू ठेक्यावर कारवाई न करणार्‍या अधिकार्‍यांवर या हत्याकांडानंतर अखेर कारवाई करण्यात आली. मृतांची संख्या वाढत असल्याचे दिसताच उत्तर प्रदेशच्या उत्पादन शुल्क आयुक्तांना निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय दोन वरिष्ठ अधिकार्‍यांनाही निलंबित करण्यात आले.

Advertisement

IBPS IBPS MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd