All News

मोदींचे प्रधान सल्लागार सिन्हा यांचा तडकाफडकी राजीनामा

मोदींचे प्रधान सल्लागार सिन्हा यांचा तडकाफडकी राजीनामा

नवी दिल्ली, दि. १६ मार्च :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सल्लागार पी. के. सिन्हा यांनी मंगळवारी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय प्रशासकीय सेवेच्या 1977 च्या बॅचचे ते अधिकारी आहेत.


सिन्हा यांना सप्टेंबर 2019 मध्ये पंतप्रधानांच्या प्रधान सल्लागारपदी नियुक्त करण्यात आले होते. यापूर्वी त्यांनी पंतप्रधान कार्यालयात ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणूनही कर्तव्य बजावले आहे. त्यांनी चार वर्षे मंत्रिमंडळ सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. याव्यतरिक्त सिन्हा हे ऊर्जा मंत्रालयात सचिवपदीही कार्यरत होते. त्यांनी आतापर्यंत सरकारच्या निरनिराळ्या खात्यांमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे.  सिन्हा हे पंतप्रधान कार्यालयातील दुसरे असे अधिकारी आहेत, ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी पंतप्रधान कार्यालयात मुख्य सचिव म्हणून कार्यरत असलेले नृपेंद्र मिश्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. सिन्हा यांना मे 2015 मध्ये दोन वर्षांसाठी मंत्रिमडळ सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी वाढवण्यात आला. त्यानंतर 2019 मध्ये मोदी यांच्या प्रधान सल्लागारपदी त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी आपल्या सेवेदरम्यान, पब्लिक अ‍ॅ़डमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदविका आणि सोशल सायन्समध्ये एम. फिल.चे शिक्षण पूर्ण केले.

Advertisement

MahaExam IBPS test2 Highclonoid Softec Pvt Ltd