All News

कोरोनाला रोखण्यासाठी आरबीआयकडून आरोग्य सुविधांसाठी ५० हजार कोटी

कोरोनाला रोखण्यासाठी आरबीआयकडून आरोग्य सुविधांसाठी ५० हजार कोटी

नवी दिल्ली, दि. ५ मे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे.याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होत आहे. अशातच आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. आरबीआय आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी 50 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.


शक्तिकांत दास म्हणाले की, "कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेतील बदलांवर रिझर्व्ह बँक नजर ठेऊन आहे. या काळात नागरिक, व्यापारी संस्था आणि दुसऱ्या लाटेमुळे प्रभावित झालेल्या घटकांच्या मदतीसाठी रिझर्व्ह बँक नियोजन करत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरून अर्थव्यवस्था आता कुठे रुळावर येत होती. परंतु देशात आता आलेल्या दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा त्या समोर मोठं संकट उभं राहिलंय. आपल्याला या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सर्व प्रकारचे नियोजन करणे आवश्यक आहे.


शक्तिकांत दास म्हणाले, ३५ हजार कोटी रूपयांच्या सरकारी सिक्युरिटीजच्या खरेदीचा दुसरा टप्पा २० मे २०२१ रोजी प्रारंभ होणार आहे. तर अत्यावश्यक आरोग्य सेवेसाठी ५० हजार कोटी रूपये दिले जातील. तसेच, प्राधान्य असलेल्या क्षेत्रांना लवकरच कर्ज आणि प्रोत्साहनची तरतूद केली जाणार आहे. याव्यतिरिक्त बँक, कोरोना बँक कर्जही तयार केलं जाईल. तसेच, SFBs साठी दहा हजार कोटींचा TLTRO आणला जाणार आहे. म्हणून १० लाख प्रति Borrower ची मर्यादा असणार आहे. यांना ३१ मार्च २०२२ पर्यंत टर्म सुविधा देण्यात येईल असल्याचं देखील दास यांनी नमूद केलं आहे.


Advertisement

IBPS test2 IBPS Highclonoid Softec Pvt Ltd