All News

खबरदारी घेऊन महाराष्ट्रातले मॉल्स उघडू शकतात तर मंदिरं का उघडली जात नाहीत? - राज ठाकरे

खबरदारी घेऊन महाराष्ट्रातले मॉल्स उघडू शकतात तर मंदिरं का उघडली जात नाहीत? - राज ठाकरे

मुंबई, दि. १७ ऑगस्ट :  योग्य खबरदारी घेऊन महाराष्ट्रातील मंदिरं उघडली पाहिजेत अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. जर खबरदारी घेऊन महाराष्ट्रातील मॉल्स उघडू शकतात तर मंदिरं का उघडली जात नाहीत ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आज त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांचं एक शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला आलं होतं. त्यांनी महाराष्ट्रातील मंदिरं सुरु करण्याबाबत राज ठाकरेंकडे निवेदन दिलं. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ही भूमिका मांडली आहे.

महाराष्ट्रातील मंदिरं हे लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून बंद आहेत. म्हणजेच मार्च महिन्यापासून ही मंदिरं बंद आहेत. कोणतीही गर्दी होऊ नये आणि कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र आता ऑगस्ट महिना उजाडला आहे. अशात हळुहळू अनलॉकच्या दिशेने आपण जात आहोत, असं सगळं असताना मंदिर उघडण्यास काय हरकत आहे ? योग्य खबरदारी घेऊन जर मॉल्स उघडले जाऊ शकतात, दुकानं उघडली जाऊ शकतात तर मग मंदिरं का उघडण्यात येत नाहीत ? असे प्रश्न राज ठाकरेंनी विचारले आहेत.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd test2 test 4 IBPS