All News

IPL 2020 : राजस्थानचा हैद्राबादवर पाच विकेट्सने विजय

IPL 2020 : राजस्थानचा हैद्राबादवर पाच विकेट्सने विजय

दुबई, दि. ११ ऑक्टोबर : राहुल टेवाटिया आणि रायन पराग या दोघांनी विजिगीषु वृत्ती दाखवत हैदराबादविरुद्ध राजस्थानला थरारक विजय मिळवून दिला.  संथ खेळपट्टीवर चिवटपणे बॅटिंग करत या दोघांनी राजस्थानला अविश्सनीय विजय मिळवून देत पराभवाची मालिका थांबवली.


प्रथम फलंदाजी करताना हैद्राबाद संघाने मनीष पांडेच्या ५४ आणि डेव्हिड वॉर्नरच्या ४८ धावांच्या बळावर २० षटकात ४ बात १५८ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या राजस्थानला स्टोक्सच्या रूपाने पहिला धक्का बसला. यानंतर स्मिथ ५ आणि बटलर १५ धावा काढून स्वस्तात बाद झाले. उथप्पाने १८ आणि सॅमसनने २६ धावांची खेळी केली. राजस्थानकडून राहुल तेवतियाने २८ चेंडूत ४५ आणि प्रियम गर्गने २६ चेंडूत ४२ धावांची आक्रमक खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. पहिले फलंदाजी करणाऱ्या सनरायजर्सला बॅटिंगने संघर्ष करावा लागला. हैदराबादकडून मनिष पांडेने सर्वाधिक ५४,  केन विल्यमसनने १२ चेंडूत नाबाद २२ धावा केल्या.

Advertisement

test2 IBPS test 4 Highclonoid Softec Pvt Ltd