All News

रश्मी शुक्ला प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल

रश्मी शुक्ला प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल

मुंबई, दि. २६ मार्च : राज्यातील नेते, पोलिस अधिकार्‍यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी राज्य गुप्तवार्ता विभागाने आज तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात इसमाने राज्य गुप्तवार्ता विभागातील गोपनीय पत्र आणि इतर तांत्रिक गोपनिय माहिती बेकायदेशीरपणे प्राप्त केली. भारतीय टेलीग्राफ अ‍ॅक्ट 1885  कलम 30 सह माहिती तंत्रज्ञान कायदा 2008 कलम 43 (व), 66 सह गोपनीयता कायदा 1923 च्या कलम 5 अन्वये अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


या गुन्हयाचा पहिला तपास सहाय्यक पोलिस आयुक्त, सायबर विभाग, गुन्हे शाखा, मुंबई करीत आहेत. वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी शासनाची दिशाभूल करून काही खासगी व्यक्तींचे फोन टॅप केलेे. त्यांची ही कृती भारतीय टेलिफोन क्टचा गैरवापर करणारी आणि संबंधित व्यक्तींच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे, असा गंभीर ठपका मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी चौकशी अहवालात ठेवला असून सरकार आता या अहवालावर काय करते, याकडे लक्ष लागले होते. प्रथमदर्शनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला असला, तरी आता शुक्ला यांच्याकडे संशयाची सुई वळली आहे.

Advertisement

MahaExam IBPS Highclonoid Softec Pvt Ltd test 4