All News

पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात ?

पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात ?

  • अर्थसंकल्पात घोषणेची शक्यता; माहिती मागविली

मुंबई, दि. २७ फेब्रुवारी  :  पेट्रोल, डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसात मोठी वाढ झाली.  पेट्रोलच्या दरांनी तर शंभरी गाठली. राज्य सरकार आता राज्यातील नागरिकांना दिलासा देण्याचा विचार करत आहे. मार्चमध्ये सादर होणार्या राज्याच्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सवलत मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असल्याची माहिती मिळाली. 


पेट्रोल-डिझेलवर राज्य सरकारकडून आकारण्यात येणार्या सेसमध्ये थोड्याफार प्रमाणात कपात केली जाण्याची शक्यता आहे. येत्या आठ मार्च रोजी सादर होणार्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील सेस काही प्रमाणात कमी केला जाऊ शकतो. राज्यात पडलेल्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी तेव्हाच्या राज्य सरकारने 2018 साली पेट्रोल आणि डिझेलवर दुष्काळ कर म्हणून 2 रुपये सेस आकारला होता. आता दुष्काळ नसला तरी हा दोन रुपये सेस अद्यापही कायम आहे. राज्य सरकार व्हॅटबरोबरच पेट्रोल आणि डिझेलवर विविध बाबींसाठी सेस आकारत आहे. यातील सेस काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. सेस कमी झाल्यास इंधनाचे दर कमी होतील आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. 


सध्या केंद्र सरकारकडून पेट्रोलवर 32.98 प्रतिलीटर तर डिझेलवर 31.83 रुपये प्रतिलीलटर इतका कर लागतो. राज्य सरकार त्यावर वेगळा कर लावते. महाराष्ट्र सरकार पेट्रोलच्या किंमतीवर 25 टक्के व्हॅट लावते, तर डिझेलवर 21 टक्के व्हॅट लावते. आता यावरही अधिकचा सेस लावला जातो. पेट्रोलवर 10 रुपये प्रतिलीटर तर डिझेलवर 3 रुपये प्रतिलीटर इतका सेस लावण्यात येतो. राज्यात 2015 मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळच्या फडणवीस सरकारने इंधनावर दोन रुपये दुष्काळ कर लावला होता. सप्टेंबर 2016 मध्ये या दुष्काळ करात एक रुपयांची वाढ करण्यात आली. एप्रिल 2017 मध्ये पेट्रोलच्या किंमतीवर अतिरिक्त तीन रुपयांचा कर लावण्यात आला. 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने महमार्गापासून 500 मीटरच्या अंतरातील दारुची दुकाने बंद झाली. त्या वेळी राज्याचा महसूल बुडाला, म्हणून पेट्रोलवर अतिरिक्त दोन रुपयांचा कर लावण्यात आला. नंतर 2018 मध्ये ही दारुची दुकाने पुन्हा सुरू झाली; परंतु कर कायम राहिला. महाविकास आघाडीच्या सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर मार्च 2020 मध्ये एक रुपये आणि जून 2020 मध्ये दोन रुपये प्रतिलीटर इतका कर लावला.

Advertisement

test2 Highclonoid Softec Pvt Ltd test 4 IBPS