All News

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सीरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना लसीचा आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सीरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना लसीचा आढावा

पुणे, दि. २८ नोव्हेंबर : कोरोनाने फक्त भारतावर नाही तर संपूर्ण जगावर संकट आणलं आहे. अशात लस लवकरात लवकर तयार करण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरु आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोरोना लशीची निर्मिती सुरु असलेल्या तीन प्रकल्पांना भेट दिली. 


कोरोना लस विकसित करणाऱ्या प्रमुख कंपन्यांना भेट दिली. यात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी सीरम इन्स्टिट्यूट भेट देऊन कोरोना लस निर्मितीसह उत्पादनाबाबत माहिती जाणून घेतल्याची माहिती सीरमचे संचालक आदर पूनावालांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोना लसचं वितरण सर्वात आधी भारतात करणार असल्याचा मोठा खुलासा आदर पूनावाला यांनी यावेळी केला. त्यामुळे लवकरच भारतात कोरोना लस उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा करण्यात येत आहे. कोरोनावरील लस तयार करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटचा ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्ट्रा झेनेका यांच्या सोबत करार झाला आहे. सीरम इन्स्टिट्यूटकडून सध्या पोलिओ, डायरीया, हिपॅटायटस, स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जाते.आज जगभरात वेगवेगळ्या आजारांवर ज्या लसींचा उपयोग केला जातो, त्यापैकी 65 टक्के लस या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतात.


Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd test2 IBPS test 4