All News

शिवार जलयुक्त झाले की फक्त पाण्याऐवजी पैसेच मुरले

शिवार जलयुक्त झाले की फक्त पाण्याऐवजी पैसेच मुरले

मुंबई, दि. १५ ऑक्टोबर : 'कॅग'ने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेतील गैरकारभारावर ताशेरे ओढल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाने या योजनेची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. विरोधकांकडून राज्य सरकारच्या निर्णयावर टीका होत आहे. तर यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे आभार. या चौकशीतून ही खरच जलयुक्त योजना होती की या योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले हे स्पष्ट होईल, अशी टीका भाजपवर रोहित पवार यांनी केली आहे. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. जलयुक्त शिवार योजनेचा मुद्दा या बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्यावर झालेल्या चर्चेनंतर मंत्रिमंडळाने योजनेची खुली चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

IBPS MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd Highclonoid Softec Pvt Ltd