All News

मध्य प्रदेशातील महिलांची राजस्थानात विक्री

मध्य प्रदेशातील महिलांची राजस्थानात विक्री

  • मानवी तस्करीचे मोठे रॅकेट; गरीब महिलांच लक्ष्य, लैंगिक अत्याचारही

जबलपूर / कोटा, दि. १२ मार्च :  जबलपूरच्या गरीब महिलांची राजस्थानात विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गरीब, असाह्य महिलांना हेरून, त्यांना चांगली नोकरी देण्याच्या आमिषाने त्यांची राजस्थानात विक्री केली जात होती. या महिलांचे घर सुटल्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि छळ छावणीतील हालअपेष्टा भोगण्याची वेळ आली. 


मध्य प्रदेशात हॉटेल किंवा अन्य ठिकाणी शे-दोनशे रुपये रोजावर काम करणा-या महिलांना जादा पैसे देण्याचे आमिष दाखविले जात असे. जास्त पगार घेण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी सौदा केला जाई. जबलपूरच्या छोट्या लाईन गेटवर असलेल्या बसू हॉटेलचा व्यवस्थापक कोटा येथील मानवी तस्करांना भेटून हा व्यवसाय करीत होता. पोलिसांनी सुरुवातीच्या चौकशीत आरोपींनी तीन महिलांना कोटा येथे नेल्याचे स्पष्ट केले. पीडित महिलांपैकी एकीवर बलात्कार आणि मदनमहलमध्ये मानवी तस्करी आणि गुवारीघाटातील दुसर्‍या गुन्ह्यामध्ये मानवी तस्करीचा समावेश आहे. मौजगंज रीवा येथे राहणारी 31 वर्षीय महिला जबलपूर शहरातील भूकंप कॉलनीत राहत होती आणि बासू हॉटेलमध्ये भाकर बनवायची. तिचे 15 वर्षांपूर्वी लग्न झाले होते; परंतु तिच्या नव-याने तिला मारहाण केली. लग्नानंतर तीन वर्षांनी महिलेला पतीने सोडले. तिला एक 12 वर्षाचा मुलगा आहे. हॉटेलमध्ये तिला दोनशे रुपये मजुरी मिळत असे. बासू हॉटेलचे व्यवस्थापक अनिल बर्मन यांनी तिची ओळख आपली पत्नी ज्योती हिच्याशी करून दिली. ज्योतीही त्याच हॉटेलमध्ये काम करायची. 25 जानेवारीला अनिलची पत्नी ज्योती यांनी तिला जबलपूरच्या घरी नेले. 26 रोजी ज्योती तिला कोटा येथे घेऊन गेली. त्यानंतर त्यांना बुंदी येथील सुरेशसिंग ठाकूर यांच्या घरी नेण्यात आले.


तिथे संबंधित महिलेला आपली विक्री झाल्याचे लक्षात आले. दोन लाख ऐंशी हजार रुपयांत तिची विक्री करण्यात आली. पीडित महिलेने तिच्याशी गैरवर्तन करू नका, अशी विनंती केली; परंतु आरोपींनी तिला धमकी दिली. तिच्या 12 वर्षाच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले. भीती व असहाय्यतेने ती जमुना शंकरसमवेत बलशाका गावी गेली. 40 दिवस आपण नरकात राहिलो, असे ती सांगते. तो संपूर्ण घरकाम करून घ्यायचा. तिला घराबाहेर जाण्यास मनाई होती. घरात कुलूप लावूनच जमुना शंकर बाहेर जायचे. दररोज रात्री तिच्यावर बलात्कार केला जात असे. त्यामुळे तिची तब्येत बिघडली. तिने जमुना शंकर यांना विश्‍वासात घेतले. मुलाला भेटून परत येण्याचे आश्वासन तिने दिले. जबलपूर गाठल्यानंतर पीडिता संजय जैन यांच्या घरी पोहोचली. पीडित महिलेने सांगितले, की आरोपीचा आपली पत्नी शालिनी जैन हिला विकण्याचा प्रयत्न केला; परंतु ती काळी-सावळी असल्याने तिला घ्यायला कुणीही तयार नव्हते. 


आरोपींनी ज्योती नावाची मुलगी राजस्थानमधील सुरेशसिंग ठाकूर यांच्यामार्फत 70 हजार रुपयांत विकली आहे. एक वर्षापूर्वी अनिल बर्मन बुंदी किल्ल्यावर भेट देण्यासाठी गेले होते, त्या वेळी सुरेशची त्यांच्याशी भेट झाली. याप्रकरणी ग्वारीघाट पोलिसांनी अनिल, त्याची पत्नी ज्योती आणि संतोषी मराठा यांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत अनिल मूळचा सिहोरा येथील असल्याचे उघडकीस आले आहे. तो बासू हॉटेलमध्ये मॅनेजर आहे. सुरेशने अनिलला राजस्थानात लग्नासाठी मुली उपलब्ध नाहीत, जर त्याने जबलपूरहून मुली आणल्या, तर त्याला ठराविक रक्कम मिळेल. यानंतर अनिलने जबलपूरमधील अनेक गरीब महिला व मुलींची विक्री केली आहे.

Advertisement

IBPS test 4 MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd