All News

भाजपा महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षपदी संध्या कुलकर्णी

भाजपा महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षपदी संध्या कुलकर्णी

नाशिक, दि. २६ ऑगस्ट : भाजपा प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्षपदी संध्या कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संध्या कुलकर्णी यांनी नाशिक शहर महिला आघाडी सरचिटणीस या पदावर दोन टर्म यशस्वीरित्या कामकाज केले असून भाजपा प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.


महिलाआघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी प्रदेश कार्यकारिणी घोषित केली आहे. कुलकर्णी या महिलांच्या सक्षमीकरण व सबलीकरणासाठी सतत कार्यरत असल्याने त्यांच्या कामाची दखल घेऊन प्रदेश भाजपातर्फे त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. त्यांची महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबददल भाजपा प्रदेश अध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी पालकमंत्री आ.गिरीश महाजन यांनी अभिनंदन केले आहे.

Advertisement

test2 Highclonoid Softec Pvt Ltd IBPS test 4