All News

खरीप हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत ८१ टक्के जास्त जमिनीवर पेरणी

खरीप हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत ८१ टक्के जास्त जमिनीवर पेरणी

दिल्ली, दि. २१ ऑगस्ट : देशातील खरिपाची पेरणी एकूण 1062.93 लाख हेक्‍टर जमिनीवर पूर्ण झाली असून गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात पेरणी खालची जमीन 979.15 लाख हेक्‍टर होती. त्यामुळे यावर्षी खरिपाच्या पेरणी क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.56 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

खरीप हंगामाच्या पेरणीची पिक निहाय सद्यस्थिती खालीलप्रमाणे:

भात :
यावर्षीची पेरणी 378 .32 लाख हेक्‍टर क्षेत्रावर झाली आहे. गेल्या वर्षी याच हंगामात पेरणी क्षेत्र 338 पूर्णांक 65 लाख हेक्टर होतं. त्या तुलनेत यावर्षी पेरणी क्षेत्रात 11.71 टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

डाळी:
यावर्षीची पेरणी 132.56 लाख हेक्‍टर क्षेत्रावर झाली आहे. गेल्या वर्षी याच हंगामात पेरणी क्षेत्र 124.15 लाख हेक्टर होतं. त्या तुलनेत यावर्षी पेरणी क्षेत्रात 6.77 टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

भरड धान्य :
यावर्षीची पेरणी 174.06 लाख हेक्‍टर क्षेत्रावर झाली आहे. गेल्या वर्षी याच हंगामात पेरणी क्षेत्र 166.80 लाख हेक्टर होतं. त्या तुलनेत यावर्षी पेरणी क्षेत्रात 4.35 टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

तेलबिया :
यावर्षीची पेरणी 191.14 लाख हेक्‍टर क्षेत्रावर झाली आहे. गेल्या वर्षी याच हंगामात पेरणी क्षेत्र 167.56 लाख हेक्टर होतं. त्या तुलनेत यावर्षी पेरणी क्षेत्रात 14.09 टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

ऊस :
यावर्षीची पेरणी 52.19 लाख हेक्‍टर क्षेत्रावर झाली आहे. गेल्या वर्षी याच हंगामात पेरणी क्षेत्र 51.62 लाख हेक्टर होतं. त्या तुलनेत यावर्षी पेरणी क्षेत्रात 1.10 टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

कापूस:
यावर्षीची पेरणी 127.69 लाख हेक्‍टर क्षेत्रावर झाली आहे. गेल्या वर्षी याच हंगामात पेरणी क्षेत्र 123.54 लाख हेक्टर होतं. त्या तुलनेत यावर्षी पेरणी क्षेत्रात 3.36 टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

ताग व मेस्ता:

यावर्षीची पेरणी 6.97 लाख हेक्‍टर क्षेत्रावर झाली आहे. गेल्या वर्षी याच हंगामात पेरणी क्षेत्र 6.86 लाख हेक्टर होतं. त्या तुलनेत यावर्षी पेरणी क्षेत्रात 1.68 टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कोविड-19 चा पेरणी क्षेत्राच्या वाढीवर कोणताही विपरीत परिणाम झालेला दिसून येत नाही.

1 जून ते 20 ऑगस्ट 2020 पर्यंत देशभरात 663.0 मिलिमीटर पाऊस झाला असून याच काळातील पूर्वीची सरासरी 628.3 मिलिमीटर पावसाची आहे. त्यामुळे यावर्षी पावसाच्या प्रमाणातही 6 टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

केंद्रीय जल समितीच्या अहवालानुसार देशातील 123 जलाशयांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 90 टक्के पाणीसाठा झाला असून गेल्या दहा वर्षांमधील पाणीसाठ्याच्या सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण 107 टक्के आहे.

Advertisement

test 4 IBPS test2 Highclonoid Softec Pvt Ltd