All News

रानभाज्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी रानभाज्या महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावेल

रानभाज्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी रानभाज्या महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावेल

सांगली, दि. ९ ऑगस्ट : पावसाळ्यात विविध गुणधर्म असणाऱ्या अनेक वनस्पती उगवतात त्यातील अनेक वनस्पती खाण्यायोग्य असतात त्यांना आपण रानभाज्या म्हणून ओळखतो. त्यातील काही रानभाज्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त व औषधीही असतात. अशा रानभाज्यांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषि विभागाने आयोजित केलेला रानभाज्या महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यक्त केली.

जिल्हा कृषी कार्यालय व प्रकल्प संचालक (आत्मा) सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने विजयनगर मधील आत्मा सभागृह येथे रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या रानभाज्या महोत्सवाचे उद्धाटन सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पृथ्वीराज पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, कृषी उपसंचालक प्रभाकर पाटील, तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, राजभाज्यांचे महत्त्व सर्वसामान्यापर्यंत जाण्यासाठी अशा महोत्सवांची व्याप्ती वाढवावी. रानभाजी महोत्सव शहरातील महत्त्तवाच्या ठिकाणी आयोजित करण्यात यावेत यामुळे रानभाज्यांना चांगले मार्केट लाभेल. त्यामुळे शेतकऱ्यांना अशा भाज्यांचे चांगले भाव मिळतील याबरोबरच जनतेला माहिती नसणाऱ्या भाज्यांचीही ओळख होईल. जून-जुलै च्या पावसाबरोबर सुरु झालेला रानभाज्यांचा हंगाम ऑक्टोबर पर्यंत चालतो. रानभाज्या निसर्गाताच उगवून येत असल्यामुळे त्या सेंद्रीय असतात त्यांची पौष्टीकताही चांगल्या दर्जाची असते. निसर्गाताच निर्माण झालेल्या या राजभाज्या जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभागाने रानभाज्यांच्या महोत्सवांचे आयोजन करावे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी यावेळी रानभाज्यांच्या प्रत्येक स्टॉलवर जावून भाज्यांची माहिती घेतली तर काही भाज्यांची चवही चाखली. प्रारंभी महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी रानभाज्या महोत्सवाच्या आयोजनाबाबत महत्व विषद केले.

Advertisement

test2 IBPS Highclonoid Softec Pvt Ltd test 4