All News

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे याचं निधन

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे याचं निधन

कोल्हापूर, दि. १४ डिसेंबर : लालमातीत भल्याभल्यांना आस्मान दाखवून पहिला हिंदकेसरी किताब पटकावणारे श्रीपती खंचनाळे यांचं निधन झालं आहे. ते 86 वर्षांचे होते. कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, अखेर आज त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनामुळे कुस्तीक्षेत्रावर शोककळा पसरलेली आहे.


गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, महिन्याभराच्या उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर आज सकाळी त्यांची उपचारदम्यान प्राणज्योत मालवलेली आहे. श्रीपती खंचनाळे हे भारताचे पहिले हिंदकेसरी होते. 1959 साली दिल्ली झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत खंचनाळे यांनी हिंदकेसरीची पहिली गदा पटकावली होती. 

Advertisement

IBPS test2 MahaExam IBPS