All News

उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाची, तीरथ सिंह रावत यांनी घेतली शपथ

उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाची, तीरथ सिंह रावत यांनी घेतली शपथ

डेहराडून, दि. १० मार्च :  उत्तराखंडमध्ये गेल्या चार दिवसांत झालेल्या वेगवान राजकीय घडामोडीनंतर भाजप खासदार तीरथ सिंह रावत यांनी आज मुख्यमंत्रिपदाचीशपथ घेतली. ते आता राज्याचे दहावे मुख्यमंत्री बनले आहेत. राज्यपाल बेबी रानी मौर्य यांनी त्यांना शपथ दिली. यापूर्वी भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत तीरथ सिंह रावत यांची एकमताने विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. या शपथविधी सोहळ्यात मंत्र्यांसह अनेक बडे नेते उपस्थित होते. 


तीरथ सिंह रावत यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. या वेळी रावत म्हणाले, की मी सर्वांना सोबत घेऊन पुढे चालेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात राहून सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. मी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. वाजपेयी आमच्यासोबत जमिनीवर बसून जेवले आहेत. रेल्वेतून सामान्य डब्यातून प्रवास केला. यातून मला प्रेरणा मिळाली. माझ्या यशात संघाकडून मिळालेली प्रेरणा आहे. पत्नी, आई-वडील सर्वांची मला साथ आहे.


’छोट्याशा गावातून आलो, मुख्यमंत्री होईल असा विचारही केला नव्हता’

आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी इथेपर्यंत पोहोचलो आहे. मी एका छोट्या गावातून आलो आहे. मुख्यमंत्री होईल, याची कल्पनाही कधी केली नव्हती. जी जबाबदारी दिली ती मी पूर्ण केली आणि आता जी जबाबदारी दिली गेली, ती आपल्या सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करेन. राज्याच्या विकासासाठी काम करेन. संघ भावना पुढे नेईन. त्रिवेंद्रसिंह रावत यांनी गेल्या दहा वर्षांत राज्याचा मोठा विकास केला आहे. हेच काम आपण पुढे घेऊन जाऊ, असा विश्वास तीरथ सिंह यांनी व्यक्त केला.



ज्यांना नाकारलं, त्यांनाच माळ!

तीरथ सिंह यांना भाजपने गेल्या चार वर्षांपूर्वी विधानसभेची उमेदवारी नाकारली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळच्या असलेल्या तीरथ सिंह यांना मुख्यमंत्री करून गुजरात पॅटर्नची पुनरावृत्ती करण्यात आली आहे. 

Advertisement

MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd test2 IBPS