All News

अणुबाँबसाठी वापरले जाणारे 21 कोटींचे युरेनियम जप्त

अणुबाँबसाठी वापरले जाणारे  21 कोटींचे युरेनियम जप्त

मुंबई, दि. ६ मे  : अणुबॉम्बसाठी वापरल्या जाणार्‍या अत्यंत ज्वालाग्राही अशा युरेनियमचा मोठा साठा मुंबईत जप्त करण्यात आला आहे. सात किलो युरेनियमसहीत मुंबईमधून दोघांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या युरेनियमची किंमत 21 कोटी रुपये आहे. महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई केली आहे. दरम्यान, हे युरेनियम नेमके कशासाठी आणली होते याचा तपास सुरु आहे. 


महाराष्ट्र एटीएसने स्फोटके बाळगणार्‍या दोघांना ताब्यात घेतले आहे. जिगर पांड्या आणि अबू ताहीर अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनाही 12 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ठाण्यात राहणारा जिगर पांड्या हा युरेनियम विकण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटीसच्या नागपाडा युनिटने सापळा रचून जिगरला अटक केली. पांड्या तसेच ताहीर या दोघांवर अ‍ॅटोमिक एनर्जी अ‍ॅक्ट 1962 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे पोलिस अधिकारी शिवदीप लांडे व त्यांच्या सहकार्‍यांनी ही कारवाई केली. 


दरम्यान, मानखुर्द येथे राहणार्‍या अबू ताहीरकडून त्याला युरेनियम मिळाले असल्याची माहिती चौकशीतून पुढे आली आहे. त्यानंतर लगेचच पोलिसांनी अबू ताहीरला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी युरेनियमचा मोठा साठा जप्त केला. इतक्या मोठ्या प्रमाणात युरेनियम कशासाठी आणले गेले होते, याचा तपास एटीएसकडून तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी जप्त केलेला हा युरेनियमचा साठा तपासणीसाठी भाभा अणुशक्ती केंद्रात पाठविण्यात आला होता. भाभा अ‍ॅटोमॅटिक रिसर्च सेंटरकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे युरेनियम अत्यंत घातक आहे.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd IBPS test 4 test2