All News

रामविलास पासवान यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

रामविलास पासवान यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पाटणा, दि. १० ऑक्टोबर : पासवान यांचे गुरूवारी दिल्लीतील रूग्णालयात निधन झाले. त्यांचे पार्थिव शुक्रवारी पाटण्यात आणले गेले. दीघा घाटावर रामविलास पासवान यांना अंतिम निरोप देण्यासाठी जनसागर उसळला होता. मोठ्या संख्येने लोकांनी साश्रूनयनांनी आपल्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली.  


बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याबरोबरच सर्वपक्षीय नेते पासवान यांना अंतिम निरोप देण्यासाठी उपस्थित राहिले. पासवान यांना मुखाग्नी दिल्यानंतर त्यांचे पुत्र चिराग यांची काही क्षण शुद्ध हरपली. त्यांना उपस्थितांनी सावरले. रामविलास पासवान यांचे दीर्घ आजाराने निधन झाले, ते ७४ वर्षांचे होते. गेल्या महिनाभरापासून पासवान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

Advertisement

test 4 IBPS IBPS Highclonoid Softec Pvt Ltd