All News

बडोदा : सामाजिक बांधिलकी जपत मशीदीतच कोविंड सेंटर

बडोदा : सामाजिक बांधिलकी जपत मशीदीतच कोविंड सेंटर

बडोदा, दि. २० एप्रिल :  कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णांना रुग्णालयात बेड्स उपलब्ध होत नाहीत. बेड्स मिळत नसल्याने अनेक रुग्णांचे हाल होत आहेत. अनेकांना वेळेत उपचार मिळत नसल्याने कोरोना रुग्णांचा मृत्यूही होत आहे. कोरोनाच्या प्रकोपामुळे रुग्णालयात बेड्स उपलब्ध नसणे आणि त्यामुळे होणारे रुग्णांचे हाल थांबवण्यासाठी बडोदे येथील एका मशिदीने सामाजिक बांधिलकी जपत मशीदीतच कोविंड सेंटर बनवले आहे. 


मशिदीने केलेल्या या अनोख्या मदतीने रुग्णालयात जागा न मिळालेल्या रुग्णांवर मशिदीतील कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत. मशिदीने समाजासमोर या कार्यातून आदर्श ठेवला आहे. मशिदीने घेतलेल्या या निर्णयाचे देशभरातून कौतुक होत आहे. गुजरातमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयांवर ताण वाढत आहे. बेड्सची कमतरता आणि सुविधांचा अभाव यामुळे अनेक रुग्ण दगावत आहेत. रुग्णालयात जागाच नसल्याने रुग्णांवर उपचार कसे करायचे, असा प्रश्‍न अनेकांपुढे उभा आहे. या मोठ्या समस्येवर बडोद्यातील जहांगीपुरा मशिदीने मार्ग शोधला आहे. ही समस्या लक्षात घेता मशिदीत कोरोना सेंटर उभआरण्याचा निर्णय विश्‍वस्तांनी घेतला. त्यानुसार मशिदीत 50 पेक्षा अधिक बेड असलेले कोरोना सेंटर बनवण्मयात आले आहे. रुग्णालयात जागा न मिळालेल्या रुग्णांवर या मशीदीतील कोरोना सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत.


याबाबत मशिदीच्या विश्‍वस्तांनी सांगितले, की रुग्णसेवा हीच ईश्‍वरसेवा आहे. या महामारीमुळे अनेक रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी बेड मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णाची समस्या लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला. मशिदीत आता प्राथनेसह रुग्णसेवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

test2 IBPS test 4 Highclonoid Softec Pvt Ltd