All News

‘यशपुष्प’ हे क्षणार्धात परिणाम करणारे जीवनस्पर्शी पुस्तक - उत्तम कांबळे

‘यशपुष्प’ हे क्षणार्धात परिणाम करणारे जीवनस्पर्शी पुस्तक  - उत्तम कांबळे

  • ग्रंथालीचा डॉ. रारावीकर लिखित पुस्तक प्रकाशन सोहळा

नाशिक, दि. ११ नोव्हेंबर : ख्यातनाम अर्थतज्ञ व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मधील संचालक डॉ. आशुतोष रारावीकर यांनी लिहिलेल्या ‘यशपुष्प’ या पुस्तकाचा विलोभनीयडिजिटल प्रकाशनसोहळा ग्रंथालीतर्फे नुकताच संपन्न झाला.

जीवनातील आनंद, यश, सकारात्मकतावाढवणारे रंग-चित्रमय पार्श्वभूमी असणारे कॉफी टेबल बुकच्या स्वरुपातील हे पुस्तक ग्रंथालीतर्फे प्रकाशित करण्यात आले. ८४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक आणि संपादक उत्तमराव कांबळेहे या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते.  ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर, कवी अरूण म्हात्रे, गजलकार प्रदीप निफाडकरआणि नाशिकच्या ज्योती स्टोअर्सचे वसंत खैरनार असे साहित्य आणि कलाक्षेत्रातील मान्यवर या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सहभागी झाले होते.

कांबळे यांनी आपल्या अप्रतिम विवेचनात सांगितले की अस्वस्थ सद्यस्थितीत चक्रव्यूहात सापडलेल्या माणसाला मार्ग दाखवणारे हे विचारप्रवर्तक सुंदर पुस्तक आहे आणि याद्वारे कविता एक वेगळं रूप, आशय आणि आकृती घेऊन मराठी साहित्यात प्रवेश करते आहे. मानवी जीवनमूल्ये जबरदस्त ताकदीने व खुबीने सांगणारे जीवनस्पर्शी आणि लालित्यपूर्ण असे हे ध्वनिमय पुस्तक जगण्याचा अर्थ समर्थपणे उलगडून दाखवते. प्रदीप वेलणकर यांनी आपल्या विलक्षण ओघवत्या शैलीत रारावीकर कुटुंबियांसमवेतच्या जिव्हाळ्याच्या आठवणींना उजाळा देत हे पुस्तक वाचकांना खूप आनंद देऊन जाईल याची खात्री बाळगा असे सांगितले.निफाडकर यांनी आपल्या व्यासंगी प्रतिभाशैलीत या नवीन साहित्यप्रकाराचे संतोषदायी ‘आशुविचार’असे नामकरण करून पुस्तकातील अनेक काव्यपंक्ती उद्धृत केल्या व मिष्किलता व उदात्ततेने व्यापलेल्या या ग्रंथाचे सविस्तर विवेचन केले. म्हात्रे यांनी डॉ. रारावीकर यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा गौरव करत हे पुस्तक म्हणजे पारिजातकाचा दरवळणारा गंध आहे असे भावपूर्ण उद्गार काढले. डॉ. रारावीकर यांनी आपल्या मंत्रमुग्ध करणार्‍या मनोगतात कुसुमाग्रजांच्या सहवासातील भावपूर्ण आठवणींना उजाळा दिला व हा ग्रंथोबा म्हणजे जीवनाला अर्थ प्राप्त करून देणारा आणि परम सुखाचा सहज सोपा मार्ग दाखवणारा साहित्यरसांनी परिपूर्ण असा एक चिरंतन दीपस्तंभ व्हावा असे भावोत्कट उद्गार काढले. ग्रंथालीचे विश्वस्तसुदेश हिंगलासपूरकरयांनी दीपावलीच्या निमित्ताने वाचकांनी ही विचारभेट एकमेकांना द्यावी-घ्यावी असे आवाहन केले. ज्योती स्टोअर्सचे संचालक खैरनार यांनी पुस्तकाच्या विक्री योजनेची माहिती दिली. अत्यंत रंगलेल्या या कार्यक्रमाचा अनेक वाचन प्रेमींनी आणि रसिकांनी सहर्ष आस्वाद घेतला.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd test2 Highclonoid Softec Pvt Ltd IBPS