All News

राम जन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख कोरोना पॉझिटिव्ह

राम जन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली, दि. १३ ऑगस्ट : ५ ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांना कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले होते. मंचावर फक्त पाच लोकांनाच परवानगी होती. यामध्ये महंत नृत्यगोपाल दास यांचा समावेश होता. यावेळी त्यांच्यासोबत मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हजर होते. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यावेळी अनेकदा महंत नृत्यगोपाल दास यांच्याजवळ गेले होते. अयोध्येतील राम जन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्यगोपाल दास यांना कोरोनाची लागण झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे ५ ऑगस्टला अयोध्येत पार पडलेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला महंत नृत्यगोपाल दास हजर होते. यावेळी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या संपर्कात आले होते.

Advertisement

test2 IBPS Highclonoid Softec Pvt Ltd MahaExam