नवी दिल्ली, दि. ५ मे : मराठा आरक्षण (Maratha Reservation Case) रद्द करण्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. महाराष्ट्र राज्याने बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला. यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मान्य करावा लागतो. पण समाजाच्या दृष्टीने हे अत्यंत दुर्दैवी आहे.' पूर्वीच्या सरकारने आणि या सरकारने देखील आपली बाजू कोर्टात जोमाने मांडली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मान्य करत संभाजीराजे यांनी असं आवाहन केलं आहे की, 'यानंतर उद्रेक होऊ नये या मताचा मी आहे. माणसं मरत आहे, यावेळी आपली माणसं जगायला हवी याकडे सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे. उद्रेक हा शब्दच कुणी काढू नये, अशी माझी मराठा समाजाला विनंती आहे.'
मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती अशोक भूषण, एल. नागेश्वर राव, एस. अब्दुल नझीर, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट या पाच सदस्यीय खंडपीठासमोर मराठा आरक्षणाची सुनावणी घेण्यात आली.
Copyright © 2023 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.