All News

तांत्रिक बदलामुळे राहुरी शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचे नवीन अंदाजपत्रक तयार होणार

तांत्रिक बदलामुळे राहुरी शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचे नवीन अंदाजपत्रक तयार होणार

मुंबई, दि. ०९ ऑक्टोबर : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहराच्या अत्याधुनिक २५.९३ कोटीच्या पाणीपुरवठा प्रकल्पात तांत्रिक बदल करण्यात आल्याने नवीन अंदाजपत्रक सादर करण्यात येणार असल्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या संयुक्त बैठकीत ठरविण्यात आले.


विधानभवनात राहुरी शहर पाणीपुरवठा योजना, कोपरगाव शहर पाणीपुरवठा योजनेसाठी साठवण तलाव निर्माण करणे आणि औरंगाबाद शहर समांतर पाणी पुरवठा योजनेविषयी आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी आमदार आशुतोष काळे यांच्यासह नगरविकास, पाणीपुरवठा व स्वछता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, राहुरी नगरपरिषद, कोपरगाव नगरपरिषद विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच राहुरी मतदारसंघातील ब्राहमणी आणि सात गावांच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली. कोपरगाव मतदार संघातील पाणी पुरवठा आणि शहरातील विकास कामाविषयी यावेळी श्री तनपुरे यांनी आढावा घेतला.


पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, राज्यातील नागरी भागात मूलभूत पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राबविण्यात येते. या योजनेची मराठवाड्यासह राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

Advertisement

MahaExam test2 IBPS Highclonoid Softec Pvt Ltd