All News

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आज होणार घोषणा

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आज होणार घोषणा

नाशिक,दि. ८ जानेवारी : आगामी ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी  नाशिक, दिल्लीच्या  नावाची चर्चा होती. मात्र महामंडळाने दिल्लीच्या नावाची चर्चा प्रसारमाध्यमांनीच केली आहे असे स्पष्ट करत घ्यानाशिकमधील गोखले एज्यूकेशन अभियांत्रिकी महाविद्यालय येथे गुरुवारी स्थळ निवड समितीने पाहणी केली. नाशिकच्या नावाची आज शुक्रवारी  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची बैठकीत घोषणा होणार आहे. 


संमेलनासाठी सार्वजनिक वाचनालय व लोकहितवादी मंडळ (नाशिक), वाङ्मयीन मंडळ (अंमळनेर) सेलू (जि. परभणी) आणि पुण्यातील सरहद संस्थेचे दिल्लीसाठीचे निमंत्रणमिळाले होते. लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण भेटीसाठी स्वीकारले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ, प्रदीप दाते, प्रकाश पायगुडे आदी सदस्य स्थळ पाहणी दौऱ्यात होते. सदस्यांनी  गोखले एज्यूकेशन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाहणी करून आढावा घेतला.   


 कोरोनाची पार्श्वभूमी बघता शासनाच्या सर्व परवानग्या घेऊन निर्णय घेतले जातील. निवासाची व्यवस्था, ग्रंथालयात काय व्यव्यस्था आहे, भोजनाची व्यवस्था, संमेलनाची जवळपास किती लोकांची जागा आहे या सगळ्याची पाहणी केली असून सदस्य बैठकीत अहवाल सादर केल्यानंतर निर्णय घेण्यात येईल. असे कार्यवाह डॉ. दादा गोरे यांनी सांगितले. 


लोकहितवादी मंडळाने नाशिकरांच्यावतीने निमंत्रण दिलेले आहे.  ठक्कर डोम, डोंगरे वसतिगृह, भोसला मिल्ट्री स्कुल,तपोवनातील जागा, स्वामीनारायण मंदिर परिसर या जागा या पूर्वी महामंडळाला दाखविल्या आहेत. संमेलन कोरोनाचे सगळे नियम पाळूनच घेतले जाईल. असे जातेगावकर यांनी सांगितले. 

Advertisement

test2 Highclonoid Softec Pvt Ltd test 4 IBPS