All News

अवकाशात भरकटलेलं चीनचं रॉकेट हिंदी महासागरात कोसळले

अवकाशात भरकटलेलं चीनचं रॉकेट हिंदी महासागरात कोसळले

बीजिंग, दि. ९  मे : जगभरात या रॉकेटचे तुकडे नेमके कुठे आदळणार याची माहिती नसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अमेरिका, मेक्सिको, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत, चीन आणि ऑस्ट्रेलिया या देशांत कुठेतरी हे रॉकेट पडेल, अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली होती. तसेच जास्तीत जास्त समुद्रात हे रॉकेट पडावे यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. आता हे रॉकेट हिंदी महासागरात पडल्यामुळे संपूर्ण जगाची चिंता मिटली आहे.


रॉकेटचे अवशेष ७२.४७ डिग्री पूर्व अशांश आणि २.६५ डिग्री उत्तर रेखांश या ठिकाणी पडले. हे ठिकाण मालदीवच्या पश्चिमेला काही अंतरावर आहे. दरम्यान चिनी अनियंत्रित रॉकेटच्या भागाला एक संकट म्हणून बघण्यात येत होते. साधरण आज म्हणजे ९ मे ला पृथ्वीतलावर हा भाग पडेल अशी शक्यता होती, पण नेमकं कुठे हा भाग पडेल याची माहिती मिळत नव्हती. नासासह जगातील इतर अंतराळ संस्था यावर नजर ठेवून होत्या.


अमेरिका, मेक्सिको, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत, चीन आणि ऑस्ट्रेलिया या देशांत कुठेतरी हे रॉकेट पडेल अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली होती. तसेच जास्तीत जास्त समुद्रात हे रॉकेट पडावे यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. आता हे रॉकेट हिंदी महासागरात पडल्याने जगाची चिंता मिटली आहे.


Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd IBPS MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd