All News

रेमडेसिव्हिरचा काळाबाजार; दोघांना नाशिकमध्ये अटक

रेमडेसिव्हिरचा काळाबाजार; दोघांना नाशिकमध्ये अटक

नाशिक, दि. ७ मे : रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. नागरिकांच्या सतर्कतेने महामार्गावर रेमडेसिव्हिर विकणार्‍यांना अटक करण्यात आली आहे. अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान, रेमडेसिव्हिर औषध विक्री वितरणावर नियंत्रण असल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा यामुळे फोल ठरला आहे. अमोल रमेश जाधव  आणि नीलेश सुरेश धामणे या दोन तरुणांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या तरुणांकडून रेमडेसिव्हिर औषध आणि गाडी जप्त केली आहे.

Advertisement

IBPS MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd test 4