All News

सीरमची लस मिळणार 220 रुपयात एक डोस

सीरमची लस मिळणार 220 रुपयात एक डोस

पुणे, दि. १२ जानेवारी : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीच्या मदतीने तयार  कोव्हिशिल्ड ही लस तयार केली आहे. कोविशिल्डच्या प्रति डोसची किंमत 220 रुपये असेल. 14 टक्के जीएसटी लावून ही किंमत ठरवण्यात आली आहे. सरकार इतक्या किमतीत सीरमकडून कोरोना लस खरेदी करणार आहे.


 राज्यात लवकरच कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सोमवारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामुळे महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी कोरोना लसीकरणाच्या प्रक्रियेला प्रारंभ होईल. या पार्श्वभूमीवर कोरोनाची लस तयार होत असलेल्या पुण्यात लसीच्या वाहतुकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. 


कुल एक्स कोल्ड चेन लिमिटेडकडून सीरम कंपनीतून देशाच्या अन्य भागांत लसीची वाहतूक केली जाणार आहे. त्यासाठी कंपनीकडून तापमान नियंत्रित करण्याची क्षमता असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले ट्रक्स सज्ज ठेवण्यात आले आहेत. कुल एक्स कोल्ड चेन लिमिटेड ही कंपनी गेल्या 12 वर्षांपासून या क्षेत्रात आहे. या कंपनीच्या अत्याधुनिक ट्रक्समध्ये उणे 25 अंश ते + 25 अंश सेल्सिअस यादरम्यान तापमान नियंत्रित करण्याची सुविधा आहे. तसेच प्रत्येक ट्रक हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. कोरोना लसीच्या वाहतुकीदरम्यान या ट्रक्सना संबंधित राज्याच्या पोलिसांकडून सुरक्षा पुरवली जाईल, अशी माहिती कुल एक्सचे संचालक कुणाल अग्रवाल यांनी दिली. 


‘सीरम’च्या लसीला परवानगी मिळाल्याचे संकेत मिळाल्यानंतर गेल्या महिनाभरापासून कुल एक्स कोल्ड चेन लिमिटेडकडून लस वितरणासाठी जोरदार तयारी सुरू आहे. भारतात कुठेही लस वितरीत करण्यासाठी सज्ज राहा, असे आम्हाला सांगण्यात आले होते. सध्याच्या घडीला आमच्याकडे 300 ते 350 ट्रक सज्ज आहेत. याशिवाय, वेळ पडल्यास आणखी 500 ते 600 ट्रक्सची व्यवस्था करण्यात येईल. आदेश मिळाल्यानंतर आम्ही तातडीने लसींचा साठा ट्रक्समध्ये लोड करायला सुरुवात करू, अशी माहिती कुल एक्सचे सहसंचालक राहुल अग्रवाल यांनी दिली.


Advertisement

IBPS test2 IBPS test 4