All News

डॉ. कलाम साहेबांचं स्वप्न पूर्ण करणे हीच खरी आदरांजली ठरेल - अजित पवार

डॉ. कलाम साहेबांचं स्वप्न पूर्ण करणे हीच खरी आदरांजली ठरेल - अजित पवार

मुंबई दि. १५ ऑक्टोबर : देशाला महाशक्ती बनविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि त्या दिशेने वाटचाल करणाऱ्या दिवंगत डॉ.कलाम साहेबांचं स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी आदरांजली वाहिली


देशाचे माजी राष्ट्रपती, थोर अणुशास्त्रज्ञ, विद्यार्थीप्रिय शिक्षक, दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेबांचा आज जन्मदिवस. डॉक्टर कलाम साहेबांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


दिवंगत कलाम साहेबांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होत असलेल्या 'वाचन प्रेरणा दिना'च्याही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.


यावेळी राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार, आमदार शेखर निकम तसेच वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd IBPS MahaExam IBPS