All News

मद्यपान करून वाहन चालविणे हानीकार

मद्यपान करून वाहन चालविणे हानीकार

न्यूयार्क, दि. २८ डिसेंबर : अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासा आणि सॅन जोस स्टेट युनिव्हर्सिटीच्या नुकत्याच झालेल्या संशोधनात म्हटले आहे, की मद्य पिऊन वाहन चालविल्याने हात आणि डोळ्यांचे संतुलन बिघडू शकते. त्यामुळे अपघात होऊ शकतात.


 संशोधनातून असा इशारा देण्यात आला आहे, की मद्यपान केल्यामुळे वाहन चालविताना किंवा अवजड यंत्रांवर काम करताना मद्यपान हानी पोहोचवू शकते. ही परिस्थिती धोकादायक आहे. रक्तातील अल्कोहोल वाढण्याचा धोका असतो. शास्त्रज्ञांच्या मते, पहिल्यांदाच हे उघड झाले आहे की 75 किलो मनुष्याच्या रक्तात अल्कोहोलची पातळी वीस टक्क्यांनी वाढते. त्यामुळे  डोळे आणि हात यांच्यातील संतुलन बिघडण्याचा धोका असतो. टेरेन्स टायसन म्हणतात,की हे  संशोधन, आम्ही ब-याच  लोकांवर केले. 20-वर्षीय तरूणांवर संशोधन केले. जो दर आठवड्याला 1 ते 2 पेग मद्य घेतो. त्यांना वेगवेगळ्या प्रमाणात अल्कोहोल असलेली अनेक पेये दिली गेली. यानंतर त्याच्या डोळ्याच्या हालचाली, त्यांच्या प्रतिक्रिया आणि रक्तातील मद्याचे प्रमाण तपासले गेले. शास्त्रज्ञांच्या मते, संशोधनातून असे समोर आले आहे की रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण वाढल्याने डोळ्यांची हालचाल बिघडू शकते. वाहन चालवण्यापूर्वी मद्यपान न करणे चांगले असा सल्ला शास्त्रज्ञ देतात.

Advertisement

IBPS IBPS test2 Highclonoid Softec Pvt Ltd