All News

आसामचे मुख्यमंत्री म्हणून हेेमंत शर्मा यांचा शपथविधी

आसामचे मुख्यमंत्री म्हणून हेेमंत शर्मा यांचा शपथविधी

गुवाहाटी, दि. १० मे :  आसामचे 15 वे मुख्यमंत्री म्हणून हेमंत बिस्वा शर्मा यांनी शपथग्रहण केली. त्यांना राज्यपाल जगदीश मुखी यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. छी. नड्डा हेदेखील सहभागी झाले होते.

सोमवारी, मुख्यमंत्र्यांसोबत 13 मंत्र्यांचाही शपथविधी पार पडला. यात भाजपचे दहा, एजीपीच्या दोन आणि यूपीपीएलच्या एका आमदाराचा समावेश आहे. आसाम विधानसभा निवडणुकीनंतर भाजप विधिमंडळ दलाच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनीच या बैठकीत शर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. यावर सर्व सदस्यांनी सहमती दर्शवली. त्यानंतर राज्यपालांची भेट घेत शर्मा यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला होता. मुख्यमंत्री शर्मा यांच्यासोबत आसामचे भाजप प्रमुख रणजितकुमार दास, आसामगढ परिषद (एजीपी) प्रमुख अतुल बोरा, यूपीपीएलचे नेते यूजी ब्रह्मा, भाजप नेते रिमाल शुक्लवैद्य, भाजप नेते चंद्र मोहन यांचा समावेश आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याअगोदर शर्मा यांनी गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात, उत्तर गुवाहाटीच्या दौल गोविंद मंदिरात पूजा-अर्चना केली.


Advertisement

test 4 IBPS test2 MahaExam