नवी दिल्ली, दि. १३ : कोरोना रुग्णसंख्येत अजूनही वाढ दिसून येत आहे. डेल्टाचेही रुग्ण वाढत असल्याची माहिती समोर येत आहे. देशात गेल्या २४ तासांत ४० हजार १२० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच ५८५ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय ४२ हजार २९५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४० हजार १२० नवे रुग्ण आढळल्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २१ लाख १७ हजार ८२६ इतकी झाली आहे. दरम्यान देशात उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ कोटी १३ लाख २ हजार ३४५ वर पोहोचली आहे. देशात सध्या ३ लाख ८५ हजार २२७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान देशात कोरोनामुळे आतापर्यंत ४ लाख ३० हजार २५४ जणांचा मृत्यू झाला आहे.
Copyright © 2023 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.