All News

राष्ट्राचा गौरव वाढविण्यात सेना विमानन कोरचे विशेष योगदान - राष्ट्रपती राम नाथ कोविंद.

राष्ट्राचा गौरव वाढविण्यात सेना विमानन कोरचे विशेष योगदान - राष्ट्रपती राम नाथ कोविंद.

राष्ट्राचा गौरव वाढविण्यात सेना विमानन कोरचे विशेष योगदान - राष्ट्रपती राम नाथ कोविंद.   ऑक्टोबर १०,



सेना विमानन कोरला ‘राष्ट्रपती निशाण’ प्रदान


नाशिक, दि. 10 : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते भारतीय सेना विमानन कोरला प्रतिष्ठेचे समजले जाणारे सन्मानाचे ‘राष्ट्रपती निशाण’ प्रदान करण्यात आले. भारतीय सेना विमानन कोरच्या सैनिकांनी राष्ट्राची प्रतिष्ठा आणि गौरव वाढविण्यात विशेष योगदान दिल्याचे गौरवोद्गार यावेळी राष्ट्रपतींनी काढले.


गांधीनगर एअरफिल्ड येथे झालेल्या या शानदार संचलन कार्यक्रमाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, राष्ट्रपती महोदयांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सविता कोविंद, ले.ज.पी.एस.राजेश्वर, ले.ज.एस.के.सैनी, ले.ज. कवलकुमार,  श्रीमती मधुलिका रावत आदी उपस्थित होते.


राष्ट्रपती श्री. कोविंद म्हणाले, सेना विमानन कोरने मागील 32 वर्षात अतुलनीय साहस आणि शौर्याचा परिचय देत अनेक मोहिमा यशस्वी केल्या. या कालावधीत आर्मी एव्हिएशनला 273 सन्मान आणि पुरस्कारदेखील प्राप्त झाले. सियाचीनसारख्या भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दृढनिश्चयाचा परिचय देत भारतीय सेनेला अभिमान वाटेल अशी कामगिरी या सैनिकांनी केली. त्यांच्या त्याग आणि शौर्यामुळे देशात शांतता नांदते, असेही श्री.कोविंद यांनी सांगितले.

 

राष्ट्रपती श्री.कोविंद म्हणाले, श्रीलंकेमधील ‘ऑपरेशन पवन’ आणि येमेनमधील ‘ऑपरेशन मेघदूत’ मध्ये आव्हानात्मक परिस्थितीत या दलाने अतुलनीय कामगिरी केली. संयुक्त राष्ट्राच्या शांतीसेनेत भारताचे दूत म्हणून जवानांनी उत्तम कामगिरी केली. आर्मी एव्हिएशन जवानांचा पराक्रम भारतीय सेनेचे जवान आणि अधिकाऱ्यांसाठी आदर्शवत आहे, असे त्यांनी सांगितले. आर्मी एव्हिएशनचे महासंचालक ले.ज.कवलकुमार यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे राष्ट्रपती श्री.कोविंद यांनी अभिनंदन केले.


यावेळी आर्मी एव्हिएशनच्या जवानांनी शानदार संचलनाद्वारे राष्ट्रपती श्री. कोविंद यांना मानवंदना दिली. संचलनात ध्रुव, चेतक, चिता आणि रुद्र हेलिकॉप्टरनी सहभाग घेतला. संचलनाचे नेतृत्व परेड कमांडंट ब्रिगेडीअर सरबजीत सिंघ बावा भल्ला यांनी केले. राष्ट्रपती निशाणाला मानवंदना देण्यात आल्यानंतर श्री. कोविंद यांचेकडून ऑफिसर कॅप्टन सूर्यलोक दत्ता यांनी निशाण स्वीकारले. आकाशातून तीन ध्रुव हेलिकॉप्टरच्या  समन्वय कृतीने निशाणाला मानवंदना देण्यात आली.


कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी, आणि आर्मी एव्हिएशनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  

आधुनिक युद्धनीती प्रशिक्षणात तोफखाना स्कूलची कामगिरी महत्त्वपूर्ण - राष्ट्रपती राम नाथ कोविंद

राष्ट्राचा गौरव वाढविण्यात सेना विमानन कोरचे विशेष योगदान - राष्ट्रपती राम नाथ कोविंद

Advertisement

IBPS IBPS Highclonoid Softec Pvt Ltd Highclonoid Softec Pvt Ltd