All News

कोरोनामुक्त झालेल्या न्यूझीलंडमध्ये १०२ दिवसानंतर पुन्हा आढळले रुग्ण

कोरोनामुक्त झालेल्या न्यूझीलंडमध्ये १०२ दिवसानंतर पुन्हा आढळले रुग्ण

मुंबई दि. १२ ऑगस्ट  :  जगात कोरोनाचे थैमान वाढत असताना न्युझीलंडने कोरोनावर मात केली होती. १०० दिवस एकही कोरोना पेशंट न सापडल्याने जगभरात न्युझीलंडची स्तुती होऊ लागली होती. मात्र, केवळ २ दिवसांनी पुन्हा न्युझीलंडवर कोरोनाचे संकट आले आहे. ऑकलंडमध्ये ४ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी याबद्दलच माहिती दिली. काल (११ ऑगस्ट) त्यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांना ऑकलंडच्या एका घरातील ४ सदस्य कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यांना कोरोनावर लगाण कशी झाली याबाबत माहिती मिळाली नाही. देशात १०२ दिवसांनंतर स्थानिक संक्रमन झाले आहे.

पंतप्रधान म्हणाल्या, न्युझीलंडचे सर्वात मोठे शहर ऑकलंडमध्ये तिसऱ्या टप्प्यातील अलर्टवर ठेवण्यात आले आहे. याचाच अर्थ लोकांना घराबाहेर पडण्यावर बंदी आहे. तसेच बार आणि अन्य अनेक व्यवसाय बंद ठेवण्यात येणार आहेत. तीन दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जाणार आहे. याद्वारे आम्ही त्या कुटुंबाला कोरोना एवढ्या कालावधीनंतर कसा झाला याचा शोध घेणार आहोत. ही माहिती गोळा करणे खूप कठीण आहे, हे माहिती असल्याचे त्या म्हणाल्या.

Advertisement

test2 IBPS Highclonoid Softec Pvt Ltd test 4